मंगळीचा प्रवास:
२०१८ च्या फेब्रुवारीत आम्ही तिघेही पवईच्या हिरानंदानी संकुलात असलेल्या TrueBil च्या अखत्यारीतील जुन्या गाड्या पाहायला गेलो आणि प्रथमदर्शनीच, लालसर रंगाच्या फोर्ड फिगो या गाडीच्या प्रेमात पडलो. किंमत वाजवी होतीच आणि मुळात फोर्ड हा माझा स्वतः चा आवडीचा ब्रँड असल्याने फारशी खळखळ न करता तिला पदरात घेतले. मनोमन तिचे 'मंगळी'असे छानसे बारसेही केले.
नोंदणीचे सोपस्कार पार करून १ मार्च २०१८ म्हणजे होळीच्या दिवशी ती आमच्या डोंबिवलीला आली. बरेच दिवस डोंबिवली-प्रभादेवी अशा फेऱ्या झाल्या नंतर तो दिवस उगवला. ५ मे २०१८ या दिवशी पहिल्यांदा ती लॉन्ग ड्राईव्हसाठी सज्ज झाली आणि स्थळ होते बसगडचा किल्ला. कल्याण-इगतपुरी-घोटीमार्गे भल्या पहाटे आम्ही निरगुडपाड्यात दाखल झालो.
त्यानंतर हळूहळू बरीच ठिकाणे पाहण्याचा योग मंगळीमुळे आला. लॉकडाउन असल्याने अनायासे वेळ मिळाला आणि विस्मरण होऊ नये म्हणून ही यादीच बनवली.
१ मार्च ते जून २०१८ पर्यंत :
निरगुडपाडा (बसगड), देहू-आळंदी, खिडकाळेश्वर, त्र्यंबकेश्वर (दुर्गभांडार), गणेश-घोळ देऊळ ;
जुलै २०१८ ते जून २०१९ पर्यंत:
घणसोली-गवळीदेव, वांगणी-बेडीसगांव, कोंडेश्वर, माहुली पायथा, हट्टी-चांदवडपर्यंत (कांचना-मंचना,धोडप, इंद्राई, राजदेहेर), लोणावळे, कोराईगड, दुधिवरे खिंडीतून लोहगड आणि तेथून घाट उतरत भाजेमार्गे मळवली, धोकावडे-आवास, उरण-बेलापूर किल्ले, मुळगाव-खंडोबा, नांदगाव-विनायक, पंढरपूर ते अक्कलकोट मार्गे पार गाणगापूर, सोलापूर किल्ला;
जुलै २०१९ ते जून २०२० पर्यंत:
सिन्नर-गोंदेश्वर, गणेशपुरी-वज्रेश्वरी, पोशीरमार्गे खांडस (पदरगड), रेवदंडा-साळाव-कोरलाई आणि लॉक-डाउन कृपेने बदलापूर

माहुली-रस्ता! |
No comments:
Post a Comment