About Me

My photo
Dombivli, Maharashtra, India
Trekker, Traveller, Movie Buff, and Dyestuff Technologist (from UDCT)

Wednesday, January 13, 2021

कलाडगड (2021_01_01)

Members: Mahesh Raut, Dhruv Mulay, Kedar Yogi, Pranjal Wagh and Malhar Chopdekar

अंगावर येणारा चढ आणि त्यात अत्यंत हुशारीने खोदलेल्या पावट्या हे कलाडगडाचे सौंदर्य म्हणायला हरकत नाही.

पाचनाईनंतर पेठेवाडीच्या अलिकडे पायथ्याला गाड्या लावल्या आणि पागोडयाच्या सावलीत दुपारचे जेवण उरकले. मग फारसा वेळ न दवडता मार्गस्थ झालो.

कड्यावरील मार्गात असलेली गुहा, तिच्या बाहेर असलेल्या सौरदिव्याच्या दांडक्यामुळे सहज कळून येते. काही ठिकाणी rock-patches किंचितसे कठीण आहेत, तिथे काळजी घेतलेली बरी.

गुहेनंतरचा मार्ग बालेकिल्ल्याला उजवीकडे ठेवत माचीकडे जातो. वाटेत काही सायकससदृश झाडे आहेत. डावीकडे असलेल्या दरीकडे पाहायचे असेल तर थोडे थांबावे. अन्यथा सावकाशपणे मार्गक्रमणा करीत जावे. 


ज्या ठिकाणी बालेकिल्ला सुरू होतो त्याच्या पायथ्याशी माचीवर पाण्याची दोन कुंडे आहेत. जे पहिले आहे त्यातील पाणी आटून गेले असले तरी एका बोळक्यात गारेगार पाण्याचा जिवंत झरा आहे. पुढच्या टाक्यात भरपूर पाणी असले तरी त्यातील कचरा पाहून आम्ही त्या बोळक्यातीलच पाणी वापरायचे ठरवले.

हे दुसरे टाके ओलांडले की लगेचच माचीवरील सपाटी चालू होते. इथून पश्चिमेच्या दिशेला असलेला कुमशेतचा कोंबडा किती अजस्त्र आहे याचा अंदाज येतो. माचीच्या टोकाला पोचलो की खाली कलाडचा अंगठा दिसतो. समोर दक्षिणेकडे नकटा (नाप्ता) आणि पूर्वेकडे हरिश्चन्द्रगड आपल्या स्वागतास तत्पर असतातच. त्यांना नीटपणे न्याहाळून मागे परत फिरावे.

माचीवर आकाशाच्या छताखाली विसावलेली शेंदूर ल्यालेली गडदैवते आहेत. त्यांच्या लगतच आम्ही आमचे तिन्ही तंबू उभारले आणि रात्रीच्या मुक्कामाच्या तयारीला लागलो.

~संभाजी राजाराम चोपडेकर

No comments:

Custom Search